Wednesday, December 19, 2018

आधी आयुष्य जागा

आयुष्य जगायच कधी
आयुष्य आनंदाने आपल्या मर्जीने स्वतंत्रपणे जागा

वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष-- प्रकृती बरी नसते.
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65 वर्षे -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
70 वर्ष--  मेला.

17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टवरून तुमचे नाव कमी

अरेच्चा
जगायचं राहूनच गेले … !

प्रत्येक वेळेस आनंदाने जगले पाहिजे
 तेंव्हा
आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने ...

आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात

बाकी सर्व इथेच राहणार आहे .

 झाडू
जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो
स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा  आज मला एक नवीन शिकायला मिळाले.
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले "काय भाव आहे ?
त्यांनी सांगितले  : "120 रूपये  किलो ."
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: " याचा काय भाव आहे "
तो बोलला  : "50 रूपये किलो"
मी विचारले  : " इतका कमी भाव .?
तो बोलला : "साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती  संगठन...समाज आणि  परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...

1 comment: