Tuesday, August 25, 2020

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार

 

Ranjitpawarakluj


छत्रपती शिवरायांच्या पावन भुमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, ज्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची ज्योत पेटवत ठेऊन शिवरायांनी पवित्र भगवा ध्वज फडकला, अश्या या महाराष्ट्रात मी जन्म घेतला हि मी माझी पुण्यायीच समजतो. येथे तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळं होण्यासारखे आहे. तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मला या वाढदिवसासाठी तुम्ही नेहमी प्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव करत माझा जन्मदिवस पुन्हा एकदा अविस्मरणीय बनवला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. आपण दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा मी कायम ऋणी राहील......तुमच प्रेम असच राहुद्या....

आपण दिलेल्या शुभेच्छांचा

अगदी मनापासून स्वीकार…

आपले मनःपूर्वक आभार…!

असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…                             

              मनापासून मी आपला आभारी  आहे

Friday, March 15, 2019

शिवज्योत 2019

राजे छत्रपती तरुण मंडळ, ठाकूरबुवा
शिवज्योत किल्ले विजयदुर्ग ते ठाकूरबुवा



श्री क्षेत्र ठाकूरबुवा :- शिवजन्मोत्सव म्हणजेच १९ फेब्रुवारी
(छत्रपती शिवाजी महाराज जन्म दिवस)
हा दिवस सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक जण हा उत्सव आपापल्या परीने साजरा करतो.
आजकाल संपूर्ण देशात नव्हे तर पूर्ण जगात महाराजांची जयंती साजरी केली जाते अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात सामाजिक प्रबोधन केले जाते असाच आगळावेगळा उपक्रम माळशिरस तालुक्यातील ठाकूरबुवा गावामध्ये केला जातो.


विजयदुर्ग ते ठाकूरबुवा संपूर्ण कार्यक्रमाचा विडिओ





ठाकूरबवा गावामध्ये गेले 13 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तुम्ही म्हणचाल ह्यात वेगळं काय आहे, तर गेली 13 वर्षे ह्या गावाने आतापर्यंत 13 किल्ल्यावरून शिवज्योत पेटवून आणली आहे ते हि 20 ते 25 मावळ्यांना घेऊन. गावात आणल्यानंतर सर्व मावळ्यांचे सत्कार केले जातात त्यानंतर लहान मुलांचे  छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार भाषणाच्या स्वरूपात मांडले जातात आणि नंतर पूर्ण गावासाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो अश्या प्रकारे दर वर्षी ह्या मंडळाचा उपक्रम राबविण्यात येतो 

Tuesday, February 12, 2019

नागाबाईचा वाडा

धर्माधिकारी प्रोडकशन्स निर्मित गणेश धर्माधिकारी दिग्दर्शित : नागाबाईचा वाडा

भीती सगळ्यांनाच वाटत असते रात्रीच्या काळोखात मांजरीच्या चकाकणाऱ्या डोळ्यांचीही भीती वाटते तरीही भयकथा आवडणारा एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग आहे
आणि खास त्यांच्यासाठीच धर्माधिकारी प्रोडक्शन्स एक horror webseries घेऊन येत आहे  त्याची ही पहिली झलक


आपल्या प्रतिक्रिया आमच्या youtube वर comment मध्ये अवश्य पाठवा आमच्यासाठी त्या अमूल्य असतील

●धर्माधिकारी प्रोडकशन्स निर्मित●
      नागाबाईचा वाडा
गीत - महानंदा
संगीत - सागर आणि विशाल
सह-दिग्दर्शक - रवी पंडित
कार्यकारी निर्माता आणि प्रसिद्धी - रणजित पवार
निर्माती - आरती पोटावे

विशेष साहाय्य - प्रभाकर भोईर (संभाजी ब्रिग्रेड अध्यक्ष), अजय शेलार (पत्रकार), सागर भोसले

दिग्दर्शक - गणेश धर्माधिकारी

Thursday, February 7, 2019

छत्रपती शिवाजी महाराज

राजे छत्रपती तरुण मंडळ, ठाकूरबुवा
"त्याच नाव शिवाजीराजे" नवीन गाणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित

Saturday, February 2, 2019

प्रज्यासत्ताक दिवस

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकूरबुवा

Monday, January 14, 2019

बापाला बघितलं आहे का कधी? 

By https://ranjitpawarakluj.business.site
मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का ?
मारून बघा,
ह्रुदय स्थिर होऊन जाईल.

मोठा झाल्यापासुन कधी
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का?
घेऊन बघा,
बापाची दाढी गालाला रुतल्यावर,
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे,
याची जाणीव होऊन जाईल .

बापाची चप्पल होते म्हणुन कोणी बाप होत नाही,
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत ,
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ?
घेऊन बघा,
बापाची किंमत कळुन जाईल .

बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल,
साधु लोकांना बाबा म्हंटल,
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ?
म्हणुन बघा,
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.

बापाचं घरावर नाव नाही,
बापाचं हातावर नाव नाही,
बापाचं छातीवर नाव नाही,
बापाचं गाडीवर नाव नाही,
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका ,
कधी परका होऊन बघितला आहे का ?
होऊन बघा,
बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.

आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला
साम्य बघितलं आहे का ?
बघुन घ्या,
दोघ ही प्रकाश देतात फक्त
वेळा वेगवेगळ्या असतात.

बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो,
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा,
आयुष्यातील सर्वात मोठा मित्र तुमच्या समोर असतो.


एका पित्याने अापल्या मुलीचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं...   जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.......


काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली.

आणि एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.


एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.

वडील म्हातारे होत चालले होते एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.

हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !


ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले. व तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले. आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की..... "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?
मुलगी स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाली. "माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?"

वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,,,,, " बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं!"

या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की,,,, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?

मुलगी ह्या वेळेस म्हणाली की,,,, "बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"


वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले..... व ते म्हणाले,,,, अगं, आताच तर तू स्वतःला जगातली सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती म्हणत होतीस.... आणि आता तू मला शक्तिशाली व्यक्ती म्हणून सांगते आहेस ?"

मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली,,, "बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.



ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बाबा!"

वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."....


खरंच आहे की,,,,,, ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.


आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त "आई-वडीलच " आपल्या प्रगतीवर खुश असतात.

 बाकी कोणीच नाही ????

      

Saturday, December 22, 2018

म्हसवड यात्रा 2018

सिद्धनाथाची यात्रा श्री क्षेत्र म्हसवड






म्हसवड :- महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या, विविध राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या एक महिना चालणाऱ्या विवाह सोहळ्याचा शुभारंभ कार्तिक शुद्ध 1 (सोमवार, दि. 4 नोव्हेंबर) म्हणजे दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रीं च्या हळदी समारंभाने झाला. आज मंगळवार, दि. 3 रोजी  रथयात्रेने या विवाह सोहळ्याची सांगता होत आहे. त्यानिमित्त...
म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखोभाविकांचे कुलदैवत म्हणून वंशपरंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. माण तालुक्यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री सिद्धनाथांचे इ. स. 10 व्या शतकातील हेमाडपंथी भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, काळभैरव, महाकाळ, शिदोबा, भांग्यादेव आदी नावानेही संबोधले जाते.






काळभैरवांची मूळ कथा
श्रीधरस्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली, त्या संबंधीचा उल्लेख पुढील प्रमाणे आढळतो. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद एकदा त्रैलोक्यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधिन सर्व काही असते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच कालभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिव श्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. लिंगरूपाने शिव भुयारात स्थित झाले व रक्षणकर्ते व शिव अवतार स्वरूप म्हणून काळभैरव व जोगेश्वरी गाभाऱ्यातील सिंहासनावर आरूढ झाले, अशी आख्यायिका आहे. भुयारातील शिवलिंग वर्षातून एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते. तेवढी रात्र संपल्यावर भुयार बंद केले जाते, ते वर्षभर बंद असते. या बंद भुयाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायमपणे वर्षभर ठेवलेल्या असतात.
सिंहासनावरील मूर्तिस्थान व शिलालेख
भुयारातील स्वयंभू शिवपिंडीच्या बरोबर माथ्यावर असणाऱ्या गाभाऱ्यातील सिंहासनावर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या गंडकी शिळेवर कोरलेल्या अप्रतिम, कोरीव काम केलेल्या, रेखीव मूर्ती उभ्या आहेत. बाहेरील भागात अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर उजव्या बाजूस एक मोठे व वेगळे शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी असलेल्या नंदी जवळील भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. लेख शिळेची वरच्या भागाची रुंदी 49 सें. मी, खालील भागाची रुंदी 65 सें. मी. आणि लांबी 110 सें. मी. आहे. एवढ्या भागात एकूण 43 ओळी आहेत. त्याच्यावरील लिपी ही मध्ययुगीन कन्नड आहे. प्रारंभीचा मंगल श्लोक आणि शेवटचा शाप-आशीर्वादात्मक श्लोक हे संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित सर्व मजकूर कन्नड भाषेत आहे. या शिलालेखाचे मराठी भाषांतर सोलापूरचे आनंद कुंभार यांनी शासनाच्या संशोधन तरंग या मासिकात केले आहे. त्यावरून हा शिलालेख इ. स. 1148 मध्ये कल्याण चालुक्य चक्रवर्ती जगदेकमल्ल (दुसरा) या राजाच्या कारकिर्दीतील कारागिरांनी कोरलेला आहे, हे स्पष्ट होते. या राजाने म्हसवड येथील जमीन सिद्धेश्वर देवास दान दिली, असा उल्लेख या शिलालेखात आढळतो.
घटस्थापना, नवरात्रारंभ व हळदी समारंभ
श्री सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध-1 (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभाऱ्याजवळ असणाऱ्या म्हातारदेवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात. हे घट 12 दिवसांचे असतात. सर्व पुजारी व भाविक या काळात उपवास करून श्रींची भक्ती करतात. याला नवरात्र म्हणतात. देवीचे नवरात्र 9 दिवसांचे असते. मात्र श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र 12 दिवसांचे असते. या घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो. याच दिवशी दुपारी 12 वाजता श्रीं चा हळदी समारंभ होतो. श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनई-चौघडा, बॅंड यांच्या मंगल गजरात हा हळदी समारंभ होतो.
घट बसलेल्या या दिवसापासून बारा दिवस उपवास करून येथील गुरव समाजातील तसेच शहरातील महिला, पुरुष, मुले, मुली आदी अबालवृद्ध पहाटे चारपासून कार्तिक स्नान करून माणगंगेच्या पात्रातून संपूर्ण नगर प्रदक्षिणा घालतात. मंदिरात काही पुजारी व भक्तगण 12 दिवस अहोरात्र उभे राहून श्रीं ची उपासना करतात. याला उभे नवरात्र म्हणतात. ही परंपरा अव्याहत, अखंडपणे सुरू आहे.


श्रीं चा विवाह सोहळा
कार्तिक शुद्ध 12 (बारस-तुलसी विवाह) रोजी रात्री साडेअकरा वाजता मंदिराच्या बाहेरील हत्ती मंडपातील सुशोभित केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसविण्यात आलेली श्रीं ची मूर्ती विवाहासाठी मंदिराचे मुख्य पुजारी (सालकरी) मंदिराच्या गाभाऱ्यात नेतात. गाभाऱ्यात जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह पारंपरिक, धार्मिक, विधिपूर्वक, शास्त्रोक्त पद्धतीने रात्री 12 वाजता मोठ्या थाटाने श्री सिद्धनाथ-देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो.
बाहेरील  हत्ती मंडपातून श्री सिद्धनाथाची मूर्ती गाभाऱ्यात नेत असताना हजारो भाविक भक्तिभावाने  मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत असतात. कारण श्रीं च्या मूर्तीस यावेळी स्पर्श झाल्यावर संपूर्ण वर्ष सुख-समृद्धी व भरभराटीचे जाते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रस्सीखेच होऊन श्रीं ची मूर्ती गाभाऱ्यात नेली जाते व नंतर पुरोहितांमार्फत धार्मिक निधीनुसार श्रीं चा विवाह सोहळा होतो.
श्रीं च्या पूजेची अखंड परंपरा
या सिद्धनाथ मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी असतात. ते वर्षभर संन्यस्त राहून सकाळ-सायंकाळ शूचिर्भूत होऊन श्रीं ची पंचामृत व गरम उदकाने स्नान, दररोज विविध अवतारातील पूजा, पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मुख्य आरती, दुपारी 3 वाजता धुपारती, रात्री साडेआठ वाजता मुख्य आरती व रात्री 10 वाजता शेजारती अशी दिवसातून पाच वेळा श्रीं ची आरती अखंडपणे सुरू असते. सालकरी यांना भाविक पूज्य मानतात.
येथील पुजारी (गुरव) व भाविकांनी श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य वर्षानुवर्षे जोपासले आहे. गावाचे व भाविकांचे एकमेव श्रद्धास्थान असणारे हे सिद्धनाथ मंदिर जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. 
वरात म्हणजे रथयात्रा
मानवी समाजामध्ये ज्या पद्धतीने हळदी समारंभ, विवाह व नंतर वरात आदी कार्यक्रमांनी विवाह सोहळा होतो, त्याच पारंपरिक पद्धतीनुसार येथील श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी या देवांचा हळदी समारंभ, विवाह व वरात हे कार्यक्रम सालाबादप्रमाणे होतात. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व हळदी समारंभ पार पडला. त्यानंतर कार्तिक शुद्ध-12 तुलसी विवाहादिवशी श्रीं चा विवाह सोहळा रात्री 12 वाजता झाला. आज मार्गशीर्ष शुद्ध-1 मंगळवार, दि. 3 डिसेंबर रोजी विवाहानंतरची वरात म्हणजेच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची "रथयात्रा' होत आहे. दणकट, मजबूत आणि भव्य अशा लाकडी, चंदनाच्या रथामध्ये श्रीं च्या उत्सवमूर्ती दुपारी 12 वाजता बसविल्या जातात. रथाला मोठे दोर बांधून माणसांच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो. श्रीं च्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती घेऊन रथामध्ये ठेवण्याचा मान गुरव समाजाला आहे. या बरोबरच रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. हा रथ ओढण्याचा मान माळी समाजाला, त्याबरोबरच बारा बलुतेदारांनाही रथ ओढण्याचा मान आहे.
माणगंगेच्या पात्रातून शहराला उजवी प्रदक्षिणा घालून दुपारी 12 वाजता सुरू झालेली ही श्रीं ची रथातील "वरात' रात्री 12 च्या पुढे मूळ ठिकाणी येते. दरम्यानच्या काळात रथावर गुलाल-खोबऱ्याची उधळण भव्य प्रमाणात होत असल्याने या दिवशी संपूर्ण म्हसवड नगरी गुलालाच्या रंगामध्ये न्हाऊन निघते. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यांचा हळदी विवाह व वरात म्हणजे रथयात्रा हे कार्यक्रम पूर्वांपार, पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहे व अव्याहत सुरू आहे. सिद्धनाथ मंदिरातील गाभाऱ्यामध्ये सागवानी लाकडापासून बनविलेले अत्यंत कलाकुसर केलेले महिरप नाथाचे मानकरी कराडचे मानकरी शिदोजीराव डुबल यांनी बसविलेले आहे. यामुळे मंदिराच्या सिंहासनाची शोभा वाढली आहे. यासाठी मोहनराव डुबल, दिग्विजय डुबल, हरिनाथ डुबल, अजित डुबल या परिवारांनी सहकार्य केले आहे. तसेच यावर्षी मंदिराच्या शिखरास रंग देण्याचे कामही डुबल परिवाराकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिराची शोभा वाढली आहे. 
विशेष बाब म्हणजे मंदिर स्थापनेपासून प्रथमच श्रीं च्या मूर्तींना वज्रलेप करण्याचे अत्यंत किचकट व खर्चिक काम देवस्थान ट्रस्टीकडून करण्यात आले असले तरी त्यातील वज्रलेपासाठी साडेचार लाख रुपये खर्च करून यातील सिंहाचा वाटा नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक व गटनेते विजय सिन्हा यांनी उचलला आहे. अर्थात वज्रलेपामुळे श्रीं च्या मूर्तींना नवचैतन्य आले आहे. श्रीं च्या मूर्ती अत्यंत आकर्षक व देखण्या दिसत आहेत. श्रीं च्या दर्शनाने तमाम भाविकांच्या समाधानामध्ये शतपटींनी वाढ होणार आहे.

#रणजित_पवार_अकलूज #Ranjitpawarakluj