Wednesday, December 19, 2018

पदवी घेतानाच विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी

आता केंद्र सरकारची नवी योजना पदवी घेतल्यानंतर लगेच मिळणार नोकरी
सरकार देणार पदवीनंतर लगेच नोकरी
नवी दिल्ली :- बेरोजगारांची वाढती संख्या ही देशापुढील मोठी समस्या बनली आहे. येत्या काही महिन्यांत देशात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनच मोदी सरकारला विरोधकांकडून धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. देशात रोजगार निर्मितीचे लक्ष्य साध्य झालेले नाही. त्यामुळे एकीकडे शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी आणि दुसरीकडे रोजगाराचे घटते प्रमाण यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होताहेत. बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, रोजगार तसेच कौशल्य विकास मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय यांनी मिळून बेरोजगारी कमी करण्यासाठी एक नवी योजना आखली आहे.




इकोनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, मोदी सरकार देशात मोठ्या प्रमाणात विद्यावृत्ती योजना (अॅप्रेंटिस स्कीम) सुरू करणार आहे. विशेष म्हणजे अतांत्रिक पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच ही विद्यावृत्ती आखण्यात आली आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी या विद्यावृत्तीचा उपयोग होईल. 



विद्यावृत्ती कार्यक्रम ६ ते १० महिन्यांचा असेल. त्यानुसार देशातील विविध कंपन्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावृत्ती देतील. यामध्ये संबंधित विद्यार्थ्याला कामाचे मानधनही दिले जाईल.  पदवी मिळाल्यानंतर कॉलेजमधून बाहेर पडताना संबंधित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीकडे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असेल. तसेच काही जणांना नोकरीही मिळालेली असेल, या हेतूनेच ही योजना आखण्यात आली आहे. तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अतांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण देणारे कॉलेज आणि विद्यापीठांवर कंपन्यांचे स्वतः लक्ष असते. त्यामुळे कॅम्पसच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच. पण अतांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे अवघड असते. केंद्र सरकारच्या वरील तिन्ही मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्यांवरून एक बैठकही घेतली. त्यामध्ये विद्यावृत्तीचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला, अशी माहिती मिळते आहे. 



प्राथमिक माहितीनुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून देशात विद्यावृत्ती कार्यक्रमाची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात देशातील १० लाख विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमासाठी १० हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
चला मराठा नवउद्योजक घडवूया

व्यवसायासाठी
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची व्याज परतावा कर्ज योजना-
1) IR - वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
2) IR - गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना.
3) (FPO) (GL-1) - गट प्रकल्प कर्ज योजना.
 योज कोणासाठी
 1) लाभार्थी  हा 18 ते 45
वयोगटातील व्यक्ती आसावा.
2)  लाभार्थी  महाराष्ट्राचा रहिवासी  असावा.
3) लाभार्थ्याचं  वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असाव.

 कोणासाठी
1) कृषी,सलग्न व पारंपारिक उपक्रमानसाठी
2) लघु व मध्यम उद्योगांसाठी - अ) उत्पादन ब) व्यापार व विक्री
3) सेवा क्षेञासाठी

  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
  • योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
  कागदपत्रे
1) उत्पन्न  दाखला (तहसिलदार )
2) रहिवासी दाखला ग्रामसेवक
3) आधार कार्ड - मो.नं.लिंक असावा
4) रेशनकार्ड
5) शाळा सोडलेला दाखला
6) असल्यास जातिचा दाखला
7) राष्ट्रीय बँक पासबुक व स्टेट मेंट झेराॕक्स 1 वर्षाची
8) पॕन कार्ड
9) IT रीटन 3 वर्षाची असल्यास किंवा तहसिल उत्पन्न दाखला
10 ) रजिस्टर मो.नं .व Email ID
11 ) प्रोजेक्ट नाव आणि अंदाज पञक

अधिक माहितीसाठी उद्योग महास्वयम संकेत स्थळाला भेट द्या
https://udyog.mahaswayam.gov.in/#/home

बदलते युग

काळानुसार बदलणे महत्त्वाचे-

१९९८ मध्ये Kodak कंपनीतील १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात ८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशा: दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले...

HMT ( घडी )
BAJAJ (स्कुटर)
DYNORA (टीव्ही)
MURPHY (रेडिओ)
NOKIA (मोबाईल)
RAJDOOT (बाईक)
AMBASDOR (कार)

 सर्व कंपनीच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती, तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर पडल्या!

कारण???

त्यांनी वेळे नुसार स्वत:मध्ये  बदल घडवून आणले नाहीत!!!

तूम्हाला अंदाज नसेल किं येणार्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज असणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!

चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे....

Uber हे फक्त एक Software आहे! त्याची स्वता:ची एकही Car नाही! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi Company आहे!

Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीचं स्वता:चं एकही होटेल नाही!

Paytm, Ola cabs, Oyo Rooms यांसारखी खुप उदाहरणे आहेत!

US मधल्या यंग वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत! येणारे काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे  १०% वाचतील तेच फक्त Super Specialist राहतील!!

 Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चे Diagnosis चार पटीनं जास्तीने Accuracy ने काम करते! २०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे.

२०२० पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील! एक असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल!

येणार्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील शेकडोंच्या आसपास किमान ९०% Cars गायब झालेली असतील....जे वाचतील एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid.... रस्ते सुनाट होऊन जातील Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल! सर्व अरबी देशात हाहाकार माजला असेल! सर्व अरबी देशात कंगाल झालेले असतील!

आपण Uber सारखे एक Software ने कार मागऊ आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभे राहिल...
तीला जर आपण दुसरी Bike च्या बरोबरीने पाहीले तर तीच्याहुण पण सस्ती असेल!!

Cars Driverless असलेल्या कारणाने ९०% Accidents   बंद होतील...Cars Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!

ड्राईव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायबच झाली तर Traffic आणि Parking सारखी   समस्या आपोआप मिटतील कारण एक Car २० Cars च्या बरोबरीने असेल!

आजपासुन ५ ते १० वर्षा अगोदर अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता...
तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय...

तुमच्या कधी लक्षात आले आहे का?

आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दूकान हे मोबाईल फोनचेच आहेत!
Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !

आता तर Paytm ने पुर्ण व्यावहार उलाढाल होतात. रेल्वे तिकीट  फोनवर बुक होतं पैसांची घेणं व देणे मोबाईल मार्फत होते... Currency Note च्या जागेवर  Plastic पैशांनी घेतली होती, आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झाले...

जग पूर्णतः तेजित बदलत आहे! डोळे,कान,नाक उघळे ठेवा नाहीतर मागे राहाल!

वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.

यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार करण्याची पद्धत आणी आपला स्वभाव बदलत राहायला पाहिजे!

"Time to Time Updates & Upgrades are must and most required"

वेळेनुसार चालत रहा..........
आणि
सक्सेसफूल बना 

आधी आयुष्य जागा

आयुष्य जगायच कधी
आयुष्य आनंदाने आपल्या मर्जीने स्वतंत्रपणे जागा

वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष-- प्रकृती बरी नसते.
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65 वर्षे -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
70 वर्ष--  मेला.

17 दिवसाच्या आत सर्व प्रॉपर्टवरून तुमचे नाव कमी

अरेच्चा
जगायचं राहूनच गेले … !

प्रत्येक वेळेस आनंदाने जगले पाहिजे
 तेंव्हा
आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने ...

आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात

बाकी सर्व इथेच राहणार आहे .

 झाडू
जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो
स्वतः"कचरा" होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा  आज मला एक नवीन शिकायला मिळाले.
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले "काय भाव आहे ?
त्यांनी सांगितले  : "120 रूपये  किलो ."
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: " याचा काय भाव आहे "
तो बोलला  : "50 रूपये किलो"
मी विचारले  : " इतका कमी भाव .?
तो बोलला : "साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती  संगठन...समाज आणि  परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...